नागोठणे पत्रकार संघाच्या स्पर्धेचे बक्षीस वितरण

| नागोठणे | वार्ताहर |

नागोठणे पत्रकार संघाने दिवाळी पाडव्यानिमित्त आयोजित घेतलेल्या रांगोळी, किल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच ग्रा.पं.च्या शिवगणेश सभागृहात शिवसेना नेते किशोरभाई जैन, सरपंच सुप्रियाताई संजय महाडीक, उपसरपंच अखलाक पानसरे, राष्ट्रवादीचे विभागीय नेते नरेंद्रशेठ जैन, भाई टके, डॉ.मिलिंद धात्रक, सहा.पोलिस निरीक्षक संदीप पोमण, संघाचे अध्यक्ष उदय भिसे,सल्लागार राजेश पोवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. नागोठणे पत्रकार संघाचे प्रत्येक कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन किशोरभाई जैन यांनी या बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी केले. यावेळी ए एसआय प्रमोद कदम, ग्रा.प.सदस्य- सचिन ठोंबरे, संतोष नागोठणेकर, शबाना मुल्ला,पूनम काळे,अमृता महाडीक, भाविका गिजे, डॉ.अनिल गीते, विवेक सुभेकर, सुनील लाड, अनिल महाडीक, दिगंबर खराडे, प्रथमेश काळे यांच्यासह स्पर्धक व नागरीक उपस्थित होते.

रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक भक्ति जाधव, व्दितीय क्रमांक मानसी राणे,तृतीय क्रमांक- सोनम म्हात्रे तसेच किल्ले स्पर्धा प्रथम क्रमांक ज्वालाग्रुप खडकआळी, व्दितीय क्रमांक वरद खंडागळे, तृतीय क्रमांक- यश पाटील यांच्यासह उत्तेजनार्थ व स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धक तसेच पर्यवेक्षक सुप्रिया परदेशी,संजय अधिकारी व सचिन मोरे यांना पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय भिसे यांनी मनोगत व्यक्त करतांना या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला असून पुढील स्पर्धेत वेलशेत व आंबेघर या गावांचा समावेश करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच 8 मार्च रोजी महिला दिनाचे औचित्त साधून नव्याने निवडून आलेल्या सर्व ग्रा.प.सरपंच, उपसरपंच तसेच सदस्यांचा सत्कार व पैठणी बक्षीस असलेली पाक कला स्पर्धा घेणार असल्याचे जाहीर केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे अध्यक्ष उदय भिसे, सल्लागार राजेश पोवळे, सचिव महेंद्र माने व स्पर्धा प्रमूख रोशन पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर सकपाळ, संदेश गायकर, नारायण म्हात्रे, सिद्धार्थ सोष्टे, संकल्प माने, आर्चित भिसे यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version