। नागोठणे । वार्ताहर ।
गद्दारांचे जिल्ह्यातून नामोनिशान मिटवून एकत्रितरीत्या संघटना बांधूया व हे करीत असताना नागोठण्याचे नाव आपण कधीच कलंकित होऊ देणार नाही, नागोठणे विभागातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत असेल, असा ठाम विश्वास शिवसेना नेते किशोर जैन यांनी व्यक्त केला. यावेळी बंडखोर आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
राज्याचे नगरविकास मंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीसोबत रायगडमधील शिवसेनेचे तीन आमदार गेल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांतून शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागोठणे विभागीय शिवसेनेकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी किशोर जैन बोलत होते. त्यानंतर येथील छ. शिवाजी महाराज चौकात जाऊन शिवसैनिकांनी बंडखोरी करणार्या एकनाथ शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हा शिवसेनेची नव्याने बांधणी केली असून, त्यामध्ये किशोर जैन यांची पेण व अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या सहसंपर्कपदी निवड केल्याने त्यांचे उपस्थित शिवसैनिकांनी अभिनंदन केले.
यावेळी किशोरभाई जैन यांच्यासह शिवसेना नागोठणे उपविभाग प्रमुख बळीराम बडे, शाखा प्रमुख धनंजय जगताप, मोहन नागोठणेकर, ज्ञानेश्वर साळुंखे, बाळू रटाटे, अनिल महाडिक, शेखर जोगत, ॠत्विक माने, दीप्ती दुर्गावले, मंजुळा शिर्के, शैलेश रावकर, बबन कळस, सुदेश येरुणकर, प्रकाश मेस्त्री, विक्रम दुर्गावले, इम्रान पानसरे, प्रमोद नागोठणेकर, भरत गिजे, महेंद्र नागोठणेकर, कैलास गोरे, विजय धामणे, गणेश जाधव, किशोर नावळे, राजू कोकळे, आल्विन नाकते, नागेश सुर्वे, चंद्रकांत दुर्गावले आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.