| पोलादपूर | वार्ताहर |
पौष्टिक तृणधान्य आहारामध्ये जास्तीत जास्त समावेश होणे काळाची गरज असून त्या अनुषंगाने पोलादपूर तालुक्यात नाचणी, वरी, राळ लागवड क्षेत्रात वाढ होण्याच्या दृष्टीने तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रांगोळी स्पर्धा जननीरामेश्वर शेतकरी गटातर्फे मारुती मंदिर गोळेगणी येथे आयोजन करण्यात आले. यावेळी 25 स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेमध्ये सिध्दी शेखर येरूणकर व ॠषाली पवार यांना प्रथम क्रमांक, नम्रता येरुणकर द्वितीय क्रमांक, मनाली झोरे तृतीय क्रमांक, कोमल शेळके, उषा येरुणकर, प्रियांका भोसले, प्रिया मोरे यांना उत्तेजनार्थ तर पौष्टिक तृणधान्य जनजागृती कार्यक्रमात उल्लेखनीय काम केल्याबद्दल सचिन दरेकर, श्रीकृष्ण पाटील, सुरेश दरवडे, विलास उतेकर या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास प्रकाश दळवी, प्रकाश मोरे, अंकुश मोरे, ज्ञानेश्वर मोरे, मनोज जाधव, अनिल रुपनवर, नामदेव येरुंणकर, शेखर येरुणकर, राजेंद्र दळवी, सुरेश मोरे, दीपक सुर्वे, दशरथ मोरे, सुभाष मोरे, आत्माराम मोरे, मधुकर मोरे, प्रकाश येरुणकर, विलास उतेकर, महिला व विद्यार्थी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज जाधव तर सूत्रसंचालन सचिन दरेकर, आभार प्रदर्शन कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे यांनी केले.