‌‘शिवसेने’च्या रांगोळी, किल्ले बनवा स्पर्धेचे बक्षीस वितरण

| कर्जत | प्रतिनिधी |
दिवाळीच्या सणानिमित्ताने कर्जत नगरपरिषद हद्दीतील मुद्रे विभागात घरगुती रांगोळी स्पर्धेचे आणि किल्ला सजावट स्पर्धेचे आयोजन युवा उपशहर प्रमुख केतन मोधळे आणि शिवसेना (शिंदे गट) मुद्रे विभागाच्या वतीने करण्यात आले होते. या दोन्ही स्पर्धेत एकूण 114 स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामधून प्रत्येकी तीन बक्षिसे काढण्यात आली.

रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक-मधुरा कर्णूक, द्वितीय क्रमांक- कीर्ती गायकवाड, तृतीय क्रमांक- संपदा बैलमारे या स्पर्धकांनी पटकावला. तर किल्ले सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक-मुद्रे वास्तू अवैन्यूमधील जय महाराष्ट्र ग्रुप परिणीती कडव आणि स्वरा जमदाडे (बालकलाकार किल्ला) द्वितीय क्रमांक- श्रद्धासागर अपार्टमेंट एस. एस.ग्रुप ऋग्वेद भोईर, सुदर्शन बाचकर (प्रतापगड किल्ला), तृतीय क्रमांक- राज दुर्गे (मुरुड जंजिरा) यांनी पटकावला.

या घरगुती रांगोळी स्पर्धेचे आणि किल्ले सजावट स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम ज्येष्ठ ग्रामस्थ दिलीप बैलमारे, पत्रकार भूषण प्रधान आणि महेश जाधव यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शिवेसनेचे युवा उपशहर प्रमुख केतन मोधळे, योगेश थोरवे, अंकुश मोधळे, दीपक मोधळे, विनायक मोधळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version