तळा महाविद्यालयाचे पारितोषिक वितरण

| तळा | वार्ताहर |
तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द ग तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी महाविद्यालयास नॅक मूल्यांकनात ए ग्रेड मिळवण्यासाठी परिश्रम घेतलेले सर्व प्राध्यापक, प्राध्यापेकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच आदर्श विद्यार्थी, आदर्श प्राध्यापक, आदर्श ग्रंथपाल व आदर्श प्राध्यापेकेतर कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला.

टी. वाय. बी.कॉम मधून आदर्श विद्यार्थी म्हणून साक्षी कीर्तने,टी.वाय. बी.ए मधून मानसी नाक्ते या विद्यार्थ्याना आदर्श विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर आदर्श प्राध्यापक म्हणून डॉ तृप्ती थोरात, आदर्श ग्रंथपाल मनोज वाढवळ व आदर्श प्राध्यापेकेत्तर कर्मचारी मितेश मुळे यांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शैक्षणिक वर्षातील उड्डाण फेस्टिवल, निबंध, वक्तृत्व, क्रीडा, रांगोळी, उत्कृष्ट विध्यार्थी, उत्कृष्ट शिबिरातील विध्यार्थी, उत्कृष्ट खेळाडू आदी उपक्रमात यश संपादन केलेले व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ नानासाहेब यादव, निवेदन डॉ. दत्ता कुंटेवाड व डॉ दिवाकर कदम तर आभार डॉ. तृप्ती थोरात यांनी केले.यावेळी संस्थेचे पदाधिकारी,प्राध्यापक, प्राध्यापेकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version