प्रो कबड्डीचा सामन्यांना 22 डिसेंबरपासून सुरुवात

। मुंबई । प्रतिनिधी ।
भारतात अल्पावधित लोकप्रिय ठरलेली लोकप्रिय प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या आठव्या हंगामाचा मुहूर्त ठरला आहे. 22 डिसेंबर पासून यु मुम्बा आणि बंगळुरु बुल्स यांच्यातील लढतीने या स्पर्धेला सुरुवात होईल. आयोजकांन यासंदर्भातील घोषणा केली. सुरुवातीच्या चार दिवसात प्रत्येक दिवशी तीन सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिल्या दिवशी यु मुम्बा आणि बंगळुरु बुल्स या लढतीशिवाय तेलगु टायटन्स विरुद्ध तमिळ थलायवाज आणि युपी योद्धा विरुद्ध गतविजेते बंगाल वॉरियर्स यांच्यात रंगत पाहायला मिळेल.
यंदाच्या हंगामातील स्पर्धा रंगणार हे पक्के ठरले असले तरी कोरोनामुळे सर्व सामने बंगळुरुमध्येच खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोडही होणार आहे. संपूर्ण स्पर्धेसाठी खेळाडू वास्तव्यास असलेल्या ठिकाणासह बंगळुरुच्या ज्या मैदानात सामने रंगणार आहेत त्याठिकाणी बायोबबलचे वातावरण तयार करण्यात आले आहे. हंगामात पहिल्यांदाच ट्रिपल हेडर्सच्या लढती रंगणार आहेत. देशभरातील कबड्डी चाहत्यांना सुरुवातीपासूनच आपल्या आवडत्या खेळाडूला पाहाता यावे, या उद्देशाने हा मोठा बदल करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला जे वेळापत्रक निश्‍चित करण्यात आले आहे. ते पहिल्या फाफपर्यंतचे आहे. जानेवारीच्या मध्यंतरी दुसर्‍या हाफमधील वेळापत्रक निश्‍चित केले जाईल.


अनिश्‍चितकाळासाठी स्थगित
विवो प्रो कबड्डी लीगचे आयोजक ममशाल स्पोर्ट्सफ आठव्या हंगामातील वेळापत्रकाची घोषणा केलीये. 22 डिसेंबर संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून हंगामाला सुरुवात होईल. या हंगामातील सर्व सामने शेरेटन ग्रँड बेंगळुरु व्हाईटफील्ड हॉटल अँण्ड कन्वेंशन सेंटरमध्ये पार पडणार आहेत.

Exit mobile version