| रसायनी | वार्ताहर |
प.पु. गुरुमाऊली व प.पू. कानिफनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने जिल्हा उत्तर रायगड अंतर्गत हिंदू नववर्ष गुढीपाडवा मिरवणुक सोहळा रविवार, दि. 30 मार्च रोजी सकाळी सात वाजता अचानक मैदान, मोहोपाडा येथून आळी आंबिवली शिवमंदिर तेथून मोहोपाडा मुख्य बाजारपेठेतील शिवाजी चौकातून नवीन पोसरी हनुमान मंदिर अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील रामानंदाचार्य नरेंद्र महाराज सांप्रदायाचे जवळपास तीन हजार भक्तगण या मिरवणुकीत सामील होणार आहेत. मोहोपाडा येथून पहाटे सकाळी 5 ते 6.30 नाश्ता व चहा वाटप, 6.45 वाजता धुपारती, 7 वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार असून, जनता विद्यालय येथे 11.30 वाजता मिरवणुकीची सांगता होणार आहे.