रसायनीत अक्षता कलशाची मिरवणूक

| रसायनी | वार्ताहर |

अक्षता कलश यात्रेचे रसायनीसह मोहोपाडा शहरात भक्तिमय वातावरणात आगमन झाले. दांडफाटा, मोहोपाडा ते वावेघर शहरात जय श्रीराम नामाच्या घोषणा देत, मंत्रोच्चारांनी अक्षता कलशाचे स्वागत करण्यात आले. रथयात्रेपुढे संयोजकांनी बाईंक रॅली काढली होती.

रसायनी प्रखंडाच्यावतीने मिरवणुकीला प्रभू श्रीरामाची भव्य प्रतिमा असलेला रथ, जय श्रीरामचा जयघोष असा आनंद आणि उत्साहपूर्ण राममय वातावरणात द़ांडफाटा येथील टाकेदेवी मंदिरातून अक्षतांचे पूजन करीत रिसवाडी, भटवाडी, रिस गाव, कांबे गाव, मातोश्री संकुल, वृंदावन फ्लोरा, गणेशनगर, चांभार्ली, शिवनगर, मोहोपाडा शहर, नविन पोसरी, आळी आंबिवली, खाने आंबिवली, वावेघर अशी कलश यात्रा काढण्यात आली.

Exit mobile version