। रसायनी । वार्ताहर ।
मोहोपाडा गावाच्या हद्दीत दांडफाटा आपटा रस्त्यावरील पिल्लई कॅम्पसच्या गेटजवळ वॅगनर कारमध्ये विदेशी दारुची वाहतूक करत असताना रसायनी पोलिसांच्या हाती लागली आहे. यात 7680 रुपये किमतीच्या 80 मिली क्षमतेच्या विदेशी दारुच्या एकूण 48 सिलबंद बॉटल, 180 मिली क्षमतेच्या विदेशी दारुच्या एकूण 48 सिलबंद बॉटल, 180 मिली क्षमतेच्या विदेशी दारुच्या एकूण 48 सिलबंद बॉटल, लंडन पिल्सनर, प्रीमियम स्ट्राँग बिअर, चार कंपनीच्या 500 मिली क्षमतेच्या विदेशी दारुच्या एकूण 24 सिलबंद टिन, एक चारचाकी सफेद रंगाची वॅगनार कार असा एकूण 94 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल मिळाला. याप्रकरणी आरोपी विकास सिंग शिवशंकर सिंग (37) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.