। कोलाड । वार्ताहर ।
पोलीस स्मुतीदिनाचे औचित्य साधून कोलाड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक नितिन मोहिते, गोपनीय पोलीस अंमलदार सहा. पो. उपनिरीक्षक नरेश पाटील, पोलीस हवालदार जाधव, महिला पोलीस अंमलदार निकम यांनी कोलाड-खांब येथील ज्ञानांकूर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कोलाड पोलीस ठाण्याकडे असणारे शस्त्रांचे प्रदर्शन केले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक रिया लोखंडे, रविंद्र लोखंडे, सुप्रिया पाशिलकर, ज्ञानेश्वर महाडीक, रुतुजा पवार, रुपाली मरवडे, प्रज्ञा माने, प्रतिक्षा धामणसे, निलम दळवी, प्रिया चिकणे आदी शिक्षकवर्ग तसेच 140 विद्यार्थ्यांनी सदर प्रदर्शनात भाग घेतला. स.पो.नि. मोहिते, गोपनीय अंमलदार सहा. पो. उपनिरीक्षक नरेश पाटील, पो. हवा. नरेश जाधव, महिला पोलीस अंमलदार पूनम निकम यांनी विद्यार्थी यांना शस्त्रांची माहिती देऊन त्याचा उपयोग कसा केला जातो, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच, पोलीस खात्याची माहिती देऊन पोलिसांच्या स्मृतीदिनाबाबत माहिती देऊन सदरचा दिवस का साजरा केला जातो, याबाबत माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना शस्त्रे हाताळण्यास दिली. पोलीसांकडील एस.एल.आर. पिस्टल, कार्बाइन गन, पंप अॅक्शन गन, हातकडी आणि विविध दारुगोळा पाहून तसेच सदरची शस्त्रे हाताळून विद्यार्थी व शिक्षकवर्ग हरकून गेले होते.







