प्रा. माणिकराव साळवे सेवानिवृत्त

| माणगाव | प्रतिनिधी |

अशोक दादा साबळे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेले माणिकराव गोविंदराव साळवे हे नियत वयोमानानुसार दि. 31 जानेवारी 2024 रोजी सेवानिवृत्त झाले. सन 1993 मध्ये आपल्या कार्याची सुरुवात केलेल्या साळवे सरांनी या विद्यालयात 31 वर्षे 5 महिने सेवा केली असून, ते इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत.

माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने अध्यक्ष अ‍ॅड. राजीव साबळे, सचिव कृष्णा गांधी, चेअरमन नरेंद्र गायकवाड, संचालक नितीन बामुगडे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, भेटवस्तू, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. शाळेच्या वतीने प्राचार्य धनाजी जाधव, उपप्राचार्य जमदाडे सर, उपमुख्याध्यापक उभारे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिकारी सर यांनी, तर आभार प्रदर्शन अंबावले सरांनी केले. या निरोप समारंभप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version