प्रा.नम्रता पाटील यांना पीएच.डी. पदवी जाहीर

| अलिबाग । वार्ताहर ।

प्रभाकर पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील कला विभाग आणि मराठी विभाग प्रमुख प्रा.नम्रता पाटील यांना नुकतीच मुंबई विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी जाहीर करण्यात आली. त्यांच्या संशोधनाचा विषय होता, रायगड जिल्ह्यातील आगरी बोलीतील लोकगीतांचा चिकित्सक अभ्यास. सदर प्रबंध त्यांनी डॉ. अलका मटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. आगरी बोलीतील लोकगीतांचा वाङ्मयीन आणि भाषिक अंगाने अभ्यास करून त्यांनी आगरी लोकसाहित्यामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यामुळे आगरी बोलीच्या जतन आणि संवर्धनामध्ये या संशोधनाचा निश्‍चितच उपयोग होणार आहे. यासाठी प्रभाकर पाटील एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील, प्रभाकर पाटील एज्युकेशन संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील आणि महाविद्यालयाचे विविध पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Exit mobile version