प्रा. शिक्षक परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी राजेंद्र नाईक

| रेवदंडा | वार्ताहर |

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेची नूतन मुरूड तालुका कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी चोरढे मराठी शाळेचे शिक्षक राजेंद्र नाईक यांची एकमताने निवड झाली आहे. तर, उपाध्यक्षपदी चेतन चव्हाण, कार्याध्यक्षपदी भास्कर साळावकर, संघटनमंत्री देवानंद गोगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचा संघर्षमय प्रवास, कार्य, यांची संपूर्ण माहिती देत, राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने शिक्षकांचे ज्वलंत प्रश्‍न सोडविले असे म्हटले.

मुरूड तालुका प्राथमिक शिक्षक कार्यकारणी निवड सभा मांडला राजिप शाळेत शनिवार, दि. 15 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेअकराच्या सुमारास घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्यासह जितेंद्र बोंडके आणि तालुक्यातील 50 प्राथमिक शिक्षक उपस्थित होते. दरम्यान, या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी राजेंद्र नाईक, उपाध्यक्ष चेतन चव्हाण, कार्याध्यक्ष भास्कर साळावकर, कोषाध्यक्ष शरद पाटील, सचिव जगदीश चवरकर, संघटनमंत्री देवानंद गोगर, प्रसिध्दी प्रमुख राजेंद्र साळावकर, महिला प्रतिनिधी रेश्मा धुमाळ, सीमा नागावकर, रूपाली वाजंत्री, प्राजक्ता पाटील, केंद्र प्रतिनिधी वळके केंद्र-हेमंत म्हात्रे, मांडला केंद्र प्रतिनिधी अभिजीत लाड, बोर्ली केंद्र प्रतिनिधी- गणेश कमळनाखवा, नांदगाव केंद्र प्रतिनिधी-राजेंद्र बुल्लू, आंगरदांडा केंद्र प्रतिनिधी-बालाजी वडवले, उर्दु प्रतिनिधी इर्षाद बैरागदार यांची निवड उपस्थित प्राथमिक शिक्षकांमधून बिनविरोध व एकमताने करण्यात आली.

Exit mobile version