| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या खालापूर तालुकाध्यक्षपदी मुख्याध्यापक संदीप रत्नाकर जाधव यांची नुकतीच निवड करण्यात आली. खालापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. मुख्याध्यापक संदीप रत्नाकर जाधव यांची सर्वानुमते एकमताने तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर कार्याध्यक्षपदी मारुती दासरे, खजिनदारपदी विठ्ठल देशमुख यांची निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी सल्लागार दिलीप दत्तात्रय देशमुख, माजी अध्यक्ष उमेश विचारे, संतोष पाटील, सरचिटणीस दीपक पालकर, जिल्हा उपाध्यक्ष सचिन कडू, शिक्षक राजेश बाविस्कर, हनुमंत गाडे, शशिकांत फणसे, जगदीश मोहने, धनाजी थिटे, पांडुरंग काळे, नारायण गाडे, बळीराम चव्हाण, आबा कदम, रवींद्र भोईर, संजय चव्हाण, संजय पाटील, राजकुमार केंद्रे, राम बिरादार, प्रदीप बडे, विशाल गावडे आदींसह अनेक शिक्षक उपस्थित होते.