प्रा. सूर्यकांत अमलपुरे यांना पी.एच.डी. पदवी प्रदान

| गोवे-कोलाड । वार्ताहर ।

कोलाड येथील तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट संचालित डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील हिंदी विभागाचे प्रमुख प्रा. सूर्यकांत विश्‍वनाथ अमलपुरे यांना मुंबई विद्यापीठाची पी. एच.डी.पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली.

अमलपुरे यांनी परिश्रम करून अनेक उच्च पदव्या संपादन केल्या असून यामध्ये एम. ए, एम.फिल, एम.एड, नेट, पी एच.डी.पदव्या प्राप्त केल्या आहेत. त्यांनी हिंदी साहित्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लेखन केले असून 50 शोध निबंध, तीन पुस्तके, 25 कविता प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या या यशा बद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर मुंडे व प्राध्यापक आणि प्राध्यापकेत्तर कर्मचारी तसेच कोलाड पंचक्रोशीतील असंख्य प्राध्यापक, माजी विद्यार्थ्यां यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version