लक्ष्मी शालिनी महाविद्यालयात कार्यक्रम

। कोर्लई । वार्ताहर ।

अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लक्ष्मी शालिनी महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयात रेड रिबन क्लब फलकाचे अनावरण करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आय.सी.टी.सी. समुपदेशक कल्पना गाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रेड रिबन क्लबचे उद्घाटन पार पडले.

आंतरराष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून या दिवशी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. संगीता चित्रकोटी याच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सुरुवातीला एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी प्रा.महेश बिर्‍हाडे यांनी प्रास्ताविक करून आंतरराष्ट्रीय युवक दिनाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या कल्पना गाडे यांनी एच.आय.व्ही.अर्थात एड्स रोगाच्या प्रसाराची कारणे, लक्षणे,आणि त्यापासून होणारे परिणाम,एड्स प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर डी .एस. आर.सी.विभागाचे समुपदेशक सचिन जाधव यांनी एच. आय. व्ही.एड्स तसेच लैंगिक आजार व त्यावरील घ्यावयाची काळजी व उपाययोजना, आणि जिल्हा रुग्णालयात असलेल्या विविध सोयी सुविधा,आणि युवकांसाठी रुग्णालय घेत असलेल्या विविध प्रकारच्या स्पर्धा,विशेषतः एड्स जनजागृती विषयी रील स्पर्धा आदीं. बाबत माहिती दिली.

याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक प्रा. दिलीप सोनवणे, प्रा. संतोष बीरारे, प्रा. डॉ. भटू वाघ, डॉ. दिलीप पाटील (ग्रंथपाल) व सर्व शिक्षकेतर कर्मचारी निलेश कुलाबकर, सारिका म्हात्रे, ज्योत्स्ना पाटील, जयवंत वाळेकर, समीर पाटील आणि रेड रिबन क्लब व एनएसएसच्या सदस्य विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Exit mobile version