स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त कार्यक्रम

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुड तालुक्यातील काशिद ग्रामपंचायत हद्दीतील चिकणी येथे सामाजिक कार्यकर्ते भिकेश दिवेकर यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. यादिवशी सकाळी श्री स्वामी समर्थ यांची विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. यावेळी बुवा चंद्रकांत जंगम यांनी पौरोहित्य केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून दुपारी भाविकांसाठी भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. काशिद येथील बुवा दत्ताराम बेलोसे, मोरे ग्रामस्थ मंडळ, रमेश दिवेकर, नांदगाव खारीकवाडा दिलिप पेडणेकर, नरेश भेर्ले, शंकर महाडीक, आदाड येथील विलास भुरे, अनंत कदम यांच्या सुश्राव्य बहारदार भजनाने भाविकांची मने रिझवली.

Exit mobile version