बेलोशीमध्ये महसूल विभागामार्फत कार्यक्रमाचे आयोजन

अभियानातून लाभार्थ्यांना दाखल्याचा आधार

| अलिबाग | प्रतिनिधी |

महसूल सप्ताह निमित्त अलिबागमध्ये वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले आहेत. त्याचा एक भाग म्हणून या सप्ताहाचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान बेलोशीमध्ये राबविण्यात आला. या अभियानातून असंख्य लाभार्थ्यांना दाखल्यांचा आधार मिळाला. या उपक्रमाला सोमवारी (दि.4) उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

अलिबाग तालुक्यातील बेलोशी ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत विविध दाखले वाटप, पीक पाहणी, जिवंत सातबारा टप्पा 2, वाळू वाटप धोरण संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच कृष्णा भोपी, पंचायत समिती माजी सदस्य श्रीधर भोपी, ग्रामपंचायत सदस्य भास्कर भोपी, गिरीश पाटील, बाळाराम शीद, सुडकोलीचे माजी सरपंच जयवंत तांबटकर, रामराजचे मंडळ अधिकारी रामराज रुपेश रेवस्कर, ग्राम महसूल अधिकारी शशिकांत कांबळे, अक्षय देशमुख, संतोष बोडके, पायल पाटील, दिशा कडू, काजल कांबळे, महसूल सेवक महेंद्र वादळ, मोहन लोभी, रामराजच्या पोलीस पाटील भारती पालकर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, रामराज मंडळातील सर्व गावांमधील ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version