प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळणार -शिंदे

रसायनी | वार्ताहर |
पनवेल,उरण परिसरातील प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असून,त्यासाठी सरकारने त्यांची गरजेपोटी बांधलेली घरे कायम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सानपाडा येथे जाहीर केले.
या पत्रकार परिषदेत शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मा आमदार मनोहरशेठ भोईर हे ही उपस्थित होते, या पत्रकार परिषदेत मध्ये सिडकोच्या हद्दीत गरजेपोटी 250 मीटर वर बांधलेली घरे नियमित केली जातील ही ठाणे जिल्हासाठी व नवी मुंबई हद्दीतील क्षेत्राला लागू होणार आहे, त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील उरण व पनवेल तालुक्यासाठी ही हा नियम/कायदा लागू होणार आहे, आशी घोषणा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.
या निर्णयामुळे उरण व पनवेल तालुक्यातील शेकडो घरे नियमित होणार असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे व सर्वांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व या विषयात सतत पाठपुरावा करणारे मनोहर भोईर यांचे या आभार मानले आहेत.

Exit mobile version