। नेरळ । प्रतिनिधी ।
रायगड पोलीस दलात काम करीत असलेल्या पोलीस कर्मचारी यांच्या खातेनिहाय बढत्या अनेक वर्षे झाल्या नव्हत्या. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी रायगड पोलीस दलातील पोलीस कर्मचारी यांची अनेक वर्षांपासूनची व्यथा समजून घेतली आणि पोलिसांना बढत्या दिल्या आहेत.कर्जत तालुक्यातील 15 पोलीस कर्मचारी यांना बढती मिळाली असून पोलीस कर्मचार्यामध्ये नवीन जबाबदारी बद्दल समाधान व्यक्त होत आहे.दरम्यान, कर्जत तालुक्यातील बढती मिळालेल्या पोलिसांना पोलीस अधीक्षक दुधे यांनी स्वतः बॅच लावून त्यांचे अभिनंदन केले.
कर्जत पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील पोलीस हवालदार खरे आणि नरुटे यांना बढती मिळाल्याबद्दल पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी फित लावून त्यांचे कौतुक केले. कर्जत पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार कृष्णा वाघमारे, संदीप नरुटे, राजेश पवार यांची सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून बढती मिळाली आहे. तर पोलीस नाईक पदावर काम करणारे मसगुडे आणि योगेश चव्हाण यांना पोलीस अंमलदार बनवले आहे. तर पोलीस शिपाई असलेले पोलीस कर्मचारी खरे, गव्हाणे,कदम, पालोदे यांना पोलीस नाईक बनवले आहे. नेरळ पोलीस ठाणेमध्ये काम करणारे पोलीस हवालदार बरकडे यांची सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती देण्यात आहे. तसेच पोलीस कर्मचारी येरुणकर, चव्हाण, पालवे, मोरे, नागरगोजे यांना बढती मिळाली आहे. त्या सर्वांचे कौतुक जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी केले.