शंकर हाके यांना पदोन्नती

। अलिबाग । वार्ताहर ।
अबकारी विभागात एएसआय पदावर कार्यरत असलेले मुनवली येथील शंकर कुशाबा हाके यांची नुकतीच दुय्यम निरीक्षक(पी.एस.आय)या पदावर पदोन्नती मिळाली आहे. यानिमित्ताने हाके यांचा श्री.गणेश मित्रमंडळ मुनवली,महिला मंडळ मुनवली तसेच ग्रामस्थांनी शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी मापगांव सदस्य सानिका घाडी, संतोष बांद्रे, सतीश घाडी, मधुकर सूद, सुधाकर ठकरूळ, सचिन घाडी, शैलेश तिर्लोटकर, मनिष खाडे, संजय अनमाने,अमोल मोंढे,सुरेश हाके, सुरेश पाटील,रोशन पुजारी,जयेश ठकरूळ,विजय पंडम,वामन ठकरूळ,सुनील मोंढे,केदार ठकरूळ,गीतेश ठकरूळ, अक्षय नागावकर,यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version