। सुतारवाडी । वार्ताहर ।
सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या द.ग. तटकरे माध्यमिक विद्यालय सुतारवाडीचे कर्मचारी विजय महाडिक यांना पदोन्नती मिळाली असून, त्यांची लेखनिकपदी नियुक्ती करण्यात आली.
यापूर्वी विजय महाडिक यांनी अलिबाग तालुक्यातील फोफेरी येथे शिपाईपदी नियुक्ती झाली होती. गेली सोळा वर्षे त्यांनी प्रामाणिकपणे सेवा केली. फोफेरीनंतर त्यांची बदली सु.ए.सो. च्या द.ग. तटकरे माध्यमिक विद्यालय सुतारवाडी येथे झाली. डिसेंबरमध्ये त्यांना पदोन्नती देऊन त्यांची लेखनिक म्हणून नियुक्ती करण्यात आली. याबद्दल सु.ए.सो.चे अध्यक्ष वसंतराव ओसवाल, सचिव रविकांत घोसाळकर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने तसेच मुख्याध्यापकांनी अभिनंदन केले.