| चिरनेर | प्रतिनिधी |
मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या प्रचारार्थ दौर्यात त्यांना उरण तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या उरण तालुक्यातील गावनिहाय प्रचार दौर्याला जासई येथून सुरुवात झाली. यावेळी प्रथम जासई येथील शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करून तालुक्यातील गावनिहाय प्रचाराला सुरुवात करण्यात आली.
यावेळी तालुक्यातील ग्रामदैवतांना साकडे घालण्यात आले. प्रचारात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गावागावात फटाक्यांच्या आतषबाजीत नेते मंडळींचे व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना लोकसभेत पाठविण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते प्रचाराच्या तयारीला लागले असून, मशाल या निशाणीचा प्रचार मतदार संघात जोरदारपणे सुरू आहे.
प्रचारादरम्यान इंडिया महाविकास आघाडीचे नेतेमंडळी व कार्यकर्ते मतदारांच्या भेटीगाठी घेऊन मतदारांशी सुसंवाद साधत आहेत. मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे – पाटील यांचा उरण तालुक्याचा गावनिहाय प्रचारदौरा शनिवारी 27 एप्रिल रोजी काढण्यात आला होता. या प्रचार दौर्याचे आयोजन उरण-पनवेल विधानसभा इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले होते. तालुक्यातील प्रचार दौर्याच्या सुरुवातीला प्रथम जासई येथील हुतात्म्यांना अभिवादन करून, प्रचार दौर्याला सुरुवात करण्यात आली.
या प्रचार दौर्यात शनिवारी 27 एप्रिल रोजी जासई, एकटघर, रांजणपाडा, सुरूंगपाडा, धुतुम, चिरले, गावठाण, जांभूळपाडा, वेश्वी, दादरपाडा, दिघोडे, कंठवली, विंधणे, खालचापाडा, नवापाडा, धाकटीजुई, बोरखार, टाकी, मोठेभोम, चिरनेर, कळंबूसरे, मोठीजुई, आवरे, गोवठणे, पाले, पिरकोन, सारडे, वशेणी, पुनाडे, कोप्रोली, खोपटा असा प्रचारदौरा करण्यात आला.
या प्रचार दौर्यात इंडिया आघाडीचे मार्गदर्शक बबनदादा पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे सरचिटणीस प्रशांत पाटील, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, इंडिया आघाडीचे भूषण पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख नरेश रहाळकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर, महिला काँग्रेस अध्यक्षा रेखा घरत, शेकापक्षाच्या सीमा घरत, शेकापचे विकास नाईक, शेकापचे ज्येष्ठ नेते काका पाटील तसेच तालुकास्तरावरील सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.