पनवेलकरांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा

| पनवेल । वार्ताहर ।

महापालिका क्षेत्रातील नागरिकांना ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून सेवासुविधा देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्यानुसार नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महापालिकेने नवीन अ‍ॅप सुरू केले आहे. या माध्यमातून चारही प्रभागातील नागरिकांना उद्यान, पाणीपुरवठा, बांधकाम, घनकचरा आणि आरोग्य, विद्युतविषयीच्या तक्रारी महापालिकेपर्यंत पोहोचवता येणार आहेत.

आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून सेवासुविधा देण्यावरती भर दिला आहे. panvelcorporation.com या वेबसाईटवरती आता जवळपास 16 प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्र (सर्व प्रभाग), जन्म व मृत्यू प्रमाणपत्र (सर्व प्रभाग), पाणी कर, निविदा प्रसिध्दी, गणपती उत्सव मंडप परवानगी, तक्रार निवारण, इमारत परवाना, आपले सरकार, माहितीचा अधिकार, नाट्यगृह हॉल बुकिंग, कोविड 19 माहिती अशा विविध सेवा-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. तसेच मालमत्ता कर भरण्यासाठी PMC T-Xn लॉन्च केले असून ही सविधा वेबसाईटवरतीही सुरू करण्यात आली आहे.

पुढील काही दिवसांमध्ये डबल इन्ट्री अकाऊंटिंग, जीआयएस बेस्ड वर्क मॅनेजमेंट, प्रधानमंत्री आवास योजना लॉटरी, वृक्ष जनगणना, पेरोल, ट्री लायन्सेस, लॅण्ड ण्ड इस्टेट या ई-सुविधा वेबसाईटवरती ऑनलाईन सुरू करण्याकरिता कार्यादेश देण्यात आले आहेत. काही दिवसातच या सुविधांही वेबसाईटवर ऑनलाईन माहिती मिळणार आहे.

Exit mobile version