| पनवेल | वार्ताहर |
सेक्टर-14 मधील डॉक्टरांच्या बंद घरात चोरट्यांनी प्रवेश करून तब्बल 14 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोली पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. डॉ. गुरूनाथ नरशेट्टी (64) हे त्यांच्या बंगल्याला कुलूप लावून कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. ही संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या लाकडी दरवाज्याचे कुलूप तोडून त्यांच्या घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकर उघडून सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, लॉकेट, मोठे आणि लहान नेक्लेस, कानातील रिंग अशा दागिन्यांसह 40 हजार रुपयांची रोकड असा एकूण 14.75 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबतची माहिती कळंबोली पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करून अज्ञात चोरट्यांविरोधात विरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.






