। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील खारघरसह तळोजात झालेल्या घरफोडीत लाखोंचा मुद्देमाल लंपास झाल्याची घटना घडली आहे. खारघर सेक्टर 35 मध्ये चोरांनी गॅलरीतून घरात प्रवेश करत मायलेकी झोपल्या असताना 50 हजारांचा मुद्देमाल चोरी केला होता. तर तळोजा उपनगरातील फेस 1 येथील सेक्टर 15 मधील पार्वती होम्स या इमारतीमध्ये मध्यरात्री चोरट्यांनी दोन घरफोड्या करून लाखोंचा मुद्देमाल पळवला आहे. ही चोरी मध्यरात्री दोन ते पहाटे सहा वाजण्याच्या दरम्यान झाली आहे. यात सेक्टर 15 येथील पार्वती होम्स या इमारतीमधील 201 आणि 202 या सदनिकांना चोरट्यांनी लक्ष्य केले. उघड्या गॅलरीमधून चोरटे घरात शिरले. तळोजातील या दोन्ही सदनिकांतून दोन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरला.
घरफोडीत लाखोंचा मुद्देमाल लंपास
