। पनवेल । वार्ताहर ।
करंजाडे वसाहतीमध्ये एका घरातून चोरांनी तब्बल दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. करंजाडे येथील आर पॉकेट 1 येथील शाम नाईक यांच्या इमारतीमधील एका सदनिकेत ही घरफोडीची घटना घडली. रात्री नऊ वाजल्यापासून पहाटेच्या दरम्यान ही चोरी झाली. चोरांनी सोन्याच्या रिंगा, चार बांगड्या आणि अंगठी असे दागिने चोरले. याबाबत पनवेल शहर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.







