| छ. संभाजीनगर | प्रतिनिधी |
अबू आझमी यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सोलापुरातील वारकरी रस्त्यावर उतरत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अबू आझमी यांच्या ‘वारीमुळे रस्ता जाम होतो’ या वक्तव्याच्या विरोधात वारकऱ्यांनी टाळ वाजवत निषेध आंदोलन केले आहे. सोलापुरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात आले. अबू आझामी यांनी त्यांचे विधान मागे घेतले नाही तर राज्यभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
अबू आझमी?
अबू आझमी यांनी म्हटले होते की, आजपर्यंत कोणत्याही मुस्लीम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात? याची तक्रार केली नाही. पण, ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा काही मशिदीतील लोकं 5 ते 10 मिनिटं रस्त्यावर नमाज पठण करतात. त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात, रस्त्यावर नमाज पठण केलं तर पासपोर्ट रद्द करु. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं की, लवकर जाऊ अन्यथा पालख्यांमुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही. पण नमाजसाठी तक्रार होते. याचा अर्थ जाणीवपूर्वक काही लोक मुस्लिमांच्या बाबतीत हे करत आहेत, असं वक्तव्य त्यांनी केले होते.







