। कर्जत । प्रतिनिधी ।
ऐन दिवाळीत जाहीर केलेले आनंदाचा शिधाचे साहित्य न मिळणे ही चक्क सरकारने गोरगरीबांची केलेली चेष्टा आहे, असा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीतर्फे राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
दिवाळीचे महत्वाचे 4 दिवस संपले तरी सरकारने जाहीर केलेले साहित्य न मिळाल्यामुळे गुरुवारी (दि.27) टिळक चौकात गरिबांची चेष्टा करणार्या राज्य सरकारचा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जाहिर निषेध करण्यात आला.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे, जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र यादव, जिल्हा सचिव अनिल गवळे, जिल्हा संघटक सुनील गायकवाड, शहर अध्यक्ष लोकेश यादव, शैलेश खोब्रागडे, सचिव प्रदीप गायकवाड, तालुका उपाध्यक्ष निलेश पवार, विकी जाधव, शरद गायकवाड, कमलाकर जाधव, धनवी काका,आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर कर्जत तहसिलदार यांची पुन्हा भेट घेऊन त्यांना लवकरात लवकर दिवाळी रेशनिंग वाटप करणेची मागणी केली यावेळी आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
