कर्जतमध्ये परभणी घटनेचा निषेध

। नेरळ । प्रतिनिधी ।

परभणी येथील घटनेचा निषेध करण्यासाठी कर्जत शहरात आरपीआय आठवले गटाकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. शहरात निघालेल्या या मोर्चात कर्जत तालुक्यातील आंबेडकरी जनता सहभागी झाली होती.

परभणी जिल्ह्यातील संविधान अपमान प्रकरण आणि सोमनाथ सुर्यवंशी या युवकाचा संशयास्पद मृत्यूचा निषेध मोर्चाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या हार अर्पण करून सुरूवात करण्यात आली. डेक्कन जिमखाना येथून हा मोर्चा मुख्य बाजारपेठेमधुन लोकमान्य टिळक चौक पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा अभिवादन करण्यात आले. या मोर्चामध्ये कर्जत तालुक्यातील आंबेडकरी जनता सहभागी झाली होती. त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे प्रमुख नेत्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. अ‍ॅड. उत्तम गायकवाड, माजी नगरसेवक दिपक मोरे, माजी शहराध्यक्ष राजु जगताप, कोकण कार्याध्यक्ष राहुल डाळिंबकर यांनी आपल्या भाषणातून निषेध नोंदवला.

यावेळी मारुती गायकवाड, अनिल सदावर्ते, जयेश शिंदे, रजनी गायकवाड, दिपक भालेराव, किशोर गायकवाड, अरविंद मोरे, अमर जाधव, राहुल गायकवाड, मनोज गायकवाड, किशोर जाधव, भालचंद्र गायकवाड, दिपक गायकवाड, अशोक गायकवाड, सुभाष पवार, संतोष जाधव,सुभाष गायकवाड, शांताराम भोईर, आदी उपस्थित होते.

Exit mobile version