विविध मागण्यांसाठी शासनाचा निषेध

| खोपोली | प्रतिनिधी |

राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी समन्वय समिती, यांच्या वतीने खालापूर तालुक्यात सर्व अधिकारी कर्मचारी एकत्र येत खालापूर पंचयत समिती ते तहसील कार्यालयापर्यत घोषणाबाजी करीत दि.8 रोजी महामोर्चा काढून प्रलंबित विविध मागण्यांसाठी शासनाचा निषेध करण्यात आला, यावेळी मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी पंचायत समितीपासून तहसील कार्यालयापर्यत घोषणाबाजी करीत महामोर्चा काढण्यात आले. कर्मचारी वर्गाच्या वतीने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले असून या निवेदनाच्या माध्यमातून सर्वांना पुर्वलक्षी प्रभावाने जुनी पेंन्शन लागू करावी, पीएफआरडीए कायदा रद्द करा, आठवा वेतन आयोगाचे गठन करा, सर्व विभागातील रिक्त पदे कायम स्वरूपी भरा, कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करा, दि.6 सप्टेंबरचा कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द करा, खासगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करा, नविन शैक्षणिक धोरण रद्द, शिक्षणाचे छुपे खाजगीकरण रद्द करा, भा.दं.वि.संहिता कलम 353 पूर्वी प्रमाणेच प्रभावी करा, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्य विना अट करा, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या पाल्यांना शासकीय सेवेत घ्या, अशा विविध मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या. या मोर्चात विनोद कडव, प्रशांत कदम, बोराटे, भांडारकर, गणेश जाधव, प्रीती मोहिते, महसूल संघटनेचे पदाधिकारी व इतर सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version