खारघरमध्ये राज्यपालां विरोधात निषेध
| पनवेल । वार्ताहर ।
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून सोमवार (दि.21) पनवेल आणि खारघरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोशारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. सुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी कोश्यारींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनास शिरीष घरत, दिपक निकम, प्रदीप ठाकूर, संदीप तांडेल, एकनाथ म्हात्रे, दिपक घरत, गुरूनाथ पाटील, यतीन देशमुख, सदानंद शिर्के, अवचित राऊत, रेवती सकपाळ, अनीता डांगरकर, रीना पाटील यांच्यासह उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आदि मिोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामोठ्यातील शिवप्रेमीचे आंदोलन
| पनवेल । वार्ताहर ।
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यानी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या बेताल वक्तव्याचा कामोठे येथील समस्त शिवप्रेमींनी सोमवारी जाहीर निषेध केला. यावेळी कामोठे पोलीस स्टेशनला निवेदन देवून शिवरायांबाबत बेताल वक्तव्य करणार्या व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली.

यावेळीसंगीता पवार,उषा डुकरे, रेखा इरोळे, विद्या धावडे, अमोल शितोळे, संतोष चिखलकर, राजकुमार पाटील, मंगेश आढाव, तुषार सावंत, मनोज महाले, किशोर मुंडे, राहुल यमगरणी, समिध फदाले, नागेश पवार, महेंद्र पाटील, यशवंत लोखंडे, वैभव खटापे, विजयराज कदम, विजय चव्हाण, शुभम पवार, दशरथ पाटील, स्वप्नील काटकर आदी उपस्थित होते.
अष्टविनायक मिनिडोर चालक मालक संघटनांकडून प्रतिकात्मक दहन
| पाली/बेणसे । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी पालीसह जिल्ह्यात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. पाली सुधागड येथे दि.(21) सोमवारी एसटी स्टँड जवळ मिनिडोर चालक मालक संघटना आणि जनतेच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोषारी यांचा निषेध दर्शविण्यात आला. याचवेळी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिकात्मक दहन केले.

राज्यपाल या घटनात्मक पदावरील व्यक्तीने अशी बेताल वक्तव्ये करू नयेत, या चुकीबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी असे संघटनेचे अध्यक्ष संजय ठकोरे म्हणाले. यावेळी प्रकाश कदम, दिनेश बुरुमकर, गणेश शिंदे, प्रकाश कामते, सुनील दळवी, अविनाश गायकवाड, संदेश भोईर ,राम हुले, महेश पोंगडे व नागरिक उपस्थित होते.
म्हसळा शिवसेनेतर्फे हटविण्याची मागणी
| म्हसळा । वार्ताहर ।
राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छ. शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने राज्याचे राजकारण चांगलेच तापले असून राज्यात विविध ठिकाणी आंदोलने करीत राज्यपाल कोश्यारी यांचा जाहीर निषेध नोंदवीला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांवर टिकेची झोड उठविली असून म्हसळ्यामध्येही शिवसेना, महिला आघाडी, युवासेनातर्फे जाहीर निषेध करून त्यांना ताबडतोब पदावरून हटविण्याची मागणी करण्यात आली असून तसें निवेदन निवासी नायब तहसीलदार गणेश तेलंगे आणि पोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे यांच्याकडे देण्यात आले.

याप्रसंगी सुरेश कुडेकर,रविंद्र लाड, मुन्ना पानसरे, कौस्तुभ करडे, अमित महामूनकर, हेमंत नाक्ती, राहुल जैन, श्रीमती महामूनकर, दीपल शिर्के, विशाल सायकर, अनिल महामूनकर, बाळा मेंदाडकर आदि मान्यवर उपस्थित होते.
श्रीवर्धन येथे राज्यपालाचा निषेध
| श्रीवर्धन । वार्ताहर ।
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या उद्घाटनाच्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केले. या विधानानंतर राज्यपालांच्या विरोधात महाराष्ट्रभर निषेध केला गेला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल एकेरी व अपशब्द काढल्यामुळे श्रीवर्धन तालुका शिवसेना व युवासेना संघटनांच्या वतीने सोमवार (दि.21) त्यांच्या विरोधात नगरपरिषद ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला.

निषेध मोर्चास अरूण शिगवण, अविनाश कोळंबेकर, सचीन गुरव, जुनैद दुस्ते, राजेश चव्हाण, अजिंकेश भाटकर, शादाब पटेल, रुची बोरकर, प्रियांका कदम, धवल तवसाळकर, शिवराज चाफेकर, प्रथमेश बारे, प्रसाद बारे, मंगेश पोलेकर, काशीनाथ गुरव तसेच तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
विद्यार्थी संघटना यांच्या वतीने निषेध
| कर्जत । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल, कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस व कर्जत तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने चार फाटा येथे जाहीर निषेध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी तानाजी चव्हाण, सागर शेळके,राजेश लाड, जगदीश ठाकरे, सोमनाथ ठोंबरे, भूषण पेमारे, नोमान नजे, वीरेंद्र जाधव, आर्केश काळोखे, राजू हजारे, सोमनाथ पालकर, सागर जोशी, शाहनवाज पानसरे, अरुण ऐणकर, ऋषी दाभाडे, जय बोराडे, तेजस भासे, रुपेश कोंडे, अप्पूराज गायकवाड, प्रवीण ठाकरे, चेतन ठाणगे, ऋषी राणे, अतुल कडू, तुषार देशमुख, महेंद्र ठोंबरे, विशाल भवारे,किशोर सावंत,भाऊ लदगे,योगेश कांबरी, संभाजी लदगे, ज्ञानेश्वर लदगे, विलास लदगे, किरण बडेकर, योगेश थोरवे, सालिक तांबोळी, तुषार देशमुख, अक्षय जाधव, श्याम पाटील,आकाश शेळके, सुदेश हजारे योगेश गंगावणे, अक्षय भोईर, सुशांत बोराडे, समीर मसणे, रोहन चव्हाण, जितू करताडे, काका ढाकवळ, सुरज शेळके आदी उपस्थित होते.