अलिबागमध्ये उद्या निषेध मोर्चा

यशश्री शिंदे हत्याप्रकरण

। अलिबाग । प्रतिनिधी ।

उरण तालुक्यातील 22 वर्षीय यशश्री शिंदे या तरुणीची निघृण हत्या करण्यात आली. मारेकराविरोधात उरण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या निषेधार्थ मंगळवारी समस्त हिंदू समाज अलिबागच्यावतीने अलिबागमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांना याबाबत निवेदन देऊन मारेकर्‍याला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी केली जाणार आहे.

यशश्री शिंदे या तरुणीवर चाकूने हल्ला करण्यात आला. तिच्या पोटावर, पाठीवर वार करून तिला गंभीर जखमी केले. तसेच तिचा चेहरा दगडाने ठेचण्यात आला. इतक्या निर्दयीपणे तिची हत्या करण्यात आली. या गुन्ह्यातील आरोपी अजूनही मोकाट आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या क्रूर हत्याविरोधात सकल हिंदू समाज अलिबागच्यावतीने मंगळवारी (दि.30) निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक अलिबाग येथे सकाळी दहा वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version