। पनवेल । वार्ताहर ।
यशश्री शिंदे व अक्षता म्हात्रे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी सोमवारी (दि.29) पनवेलमध्ये सर्वपक्षीय राजकीय पक्ष व समाजातील विविध सामाजिक संघटना तसेच शालेय विद्यार्थीनी एकत्रित येऊन आक्रोश मोर्चा काढून आपल्या भावना व्यक्त केल्या. या मोर्चामध्ये पनवेल महापालिकेचे मा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह महिला आघाडीच्या कल्पना पाटील, रेवती सकपाळ, प्रमिला कुरघोडे, अर्चना कुळकर्णी, अनुराधा ठोकळ, प्रिती जॉर्ज, निर्मला म्हात्रे, विद्या चव्हाण, शशिकला सिंह, माधुरी गोसावी, सुदाम पाटील, हेमराज म्हात्रे, अच्युत मनोरे, गणेश कडू, प्रवीण जाधव, लतिफ शेख आदींसह मोठ्या संख्येने पनवेलवासिय या मोर्चात सहभागी झाले होते. त्यांनी ‘दोषींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे’ यासाठी हा खटला फास्ट ट्रॅकवर चालविण्यात यावा, अशी मागणी शासनाकडे केली आहे.






