गांधी चौकात निषेध आंदोलन

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: null;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 39;

। उरण । वार्ताहर ।

बदलापूर शहरातील घटनेचा निषेध व्यक्त करणार्‍यासाठी मविआच्या नेत्यांनी शनिवारी उरण शहरातील गांधी चौकात तोंडावर काळ्या फिती लावून व हातात काळा झेंडा घेऊन शांततेच्या मार्गाने निषेध आंदोलन केले. यावेळी शहरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता. हे आंदोलन सकाळी साडेअकराच्या सुमारास सुरू करण्यात आले होते. या निषेध आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर भोईर, शेकाप नेते प्रितम म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, निरंतन कदम, कामगार नेते भुषण पाटील, महिला नेत्या सिमाताई घरत, शेकापचे रमाकांत म्हात्रे, माजी सभापती नरेश घरत, काँग्रेस पक्षाचे बबन काबळी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मनोज भगत, नाना नलावडेंसह मविआचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Exit mobile version