| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
नैना प्रकल्प शेतकर्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा असल्याने, नैना प्रकल्पास विरोध दर्शविण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात अॅड. सुरेश ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. खासदार श्रीकांत शिंदे, यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
आंदोलनात नैना प्रकल्प बाधित उत्कर्ष समितीचे अध्यक्ष वामन शेळके, बाळाराम फडके, बबन फडके, गजानन पाटील, सुनिल पाटील, रविंद्र फडके, सुरेश पाटील, संदेश फडके, जगदीश वाघमारे पांडुरंग वाघमारे, सुदाम वाघमारे, हरिश्चंद्र वाघमारे, विलास घरत सहभागी झाले होते.