खोपोलीत राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांचे आंदोलन

खोपोली | वार्ताहर |
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात खोपोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महिलांना जोरदार घोषणाबाजी केली. आ.दरेकरांच्या फोटो जोडे मारून आंदोलन करीत निषेध व्यक्त केला.तसेच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. खोपोली शहराच्या वतीने गुरूवारी ि आंबेडकर स्मारकासमोरील पटांगणात जोरदार घोषणाबाजी करीत दरेकरांच्या फोटो जोडे मारून आंदोलन केले.यावेळी नगराध्यक्षा सुमन औसरमल,नगरसेवक मोहन औसरमल, अतुल पाटील सुवर्णा मोरे, सविता गायकवाड, जयश्री डोंगरे, अश्‍विनी ढोले,प्रज्ञा महाडिक,उर्मिला गायकवाड, प्रियाका मोरे,भाग्यश्री गुडूर,गौरी भस्मे,महिला कार्यकर्त्या अमित पवार, विनोद रजपूत, भास्कर लांडगे,विशाल गायकवाड,जयेश गोसावी आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version