। खोपोली । प्रतिनिधी ।
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला समोरील जागेत आंबेडकर भवन उभारून त्याचा वापर सर्व जातीधर्माच्या लोकांना वापर करता येईल यासाठी आंबेडकरी नेते गेल्या वीस वर्षापासून नगरपरिषदेला निवेदन देउन मागणी करत आहेत. नगरपरिषदेने काही दिवसांपूर्वी टेंडर काढून या जागेत पे अँण्ड पार्किंग सुरू केल्याचे बोर्ड लावले आहे. शिव, शाहु, फुले, आंबेडकर विचार मंचच्या पदाधिकर्यांनी शुक्रवारी (दि.29) मार्च रोजी सकाळी 11 वाजता जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केलो. खोपोली नगरपालिका आणि ठेकेदाराने दादागिरी केल्यास शिव, शाहु, फुले, आंबेडकर विचार मंच जशास तसे उत्तर देउ, असा इशार देत या जागेवर भव्य दिव्य असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन होणार, असा निर्धार केला आहे.
यावेळी मोहन औसरमल, किशोर पानसरे, रविंद्र रोकडे, यशवंत गायकवाड, चिंतामनी सोनावणे, केविना गायकवाड, सुवर्णा मोरे, ओव्हाळ, रूपवेश रूपवते, विकी गायकवाड, विशाल गायकवाड, प्रकाश साळुंके, दिपक गायकवाड, राजू गायकवाड, गोपिनाथ सोनावणे, शंकर कांबले यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.