| आगरदांडा | प्रतिनिधी |
महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी संभाजी भिडेंचा मुरुड तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तीव्र निषेध नोंदविला.
यावेळी शेकाप जिल्हा उपचिटणीस मनोज भगत, तालुका चिटणीस अजित कासार, माजी सभापती रमेश नागावकर, चंद्रकांत कमाने, तुकाराम पाटील, विजय गिदी, सागर कन्या मच्छिमार सोसायटी चेअरमन मनोहर बैले, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मुरुड संतोष कांबळी, शरद चवरकर, अल्पसंख्याक अध्यक्ष रिझवान फईम, मधुकर पाटील, मुबशीर लालसे, शेकाप पुरोगामी युवक संघटना तालुका उपाध्यक्ष राहील कडू, रमेश दिवेकर, विकास दिवेकर, संतोष पाटील, संतोष मोकल, सचिन पाटील, वामन चुनेकर, मनोज भोपी आदींसह शेकापचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संभाजी भिडे यांच्यावर ताबडतोब कारवाई करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी अजित कासार यांनी केली. तर, या देशद्रोही समाजकंटकावर तातडीने कारवाई व्हायला हवी, अशी मागणी मनोज भगत यांनी केली.