महसूल कर्मचार्‍यांची निदर्शने

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मंत्रालय स्तरावर प्रलंबित असलेल्या विभाग निहाय संपूर्ण पदोन्नती प्रस्तवास तात्काळ मान्यता प्रदान करून आदेश निगर्मित करणे,महसूल सहाय्यक यांची पदे भरण्यात यावे या मागणीसाठी महसूल कर्मचार्‍यांनी सोमवारी ( 4 एप्रिल) पासून बेमुदत संप सुरु केला असून,अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्यावतीने निदर्शनेही करण्यात आली.

महसूल संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष केतन भगत,उपाध्यक्ष प्रफुल्ल कानिटकर, सरचिटणीस भूषण पाटील,कार्याध्यक्ष जी.एस.माने, महिला संघटक दर्शना पाटील,योजना शिंदे, अलिबाग विभाग उपाध्यक्ष दर्शना कांबळे,पनवेल विभाग गोविंद सगर आदींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष केतन भगत यांनी सांगितले आहे.केतन भगत यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य कर्मचारी महसूल कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,नागपूर, कोकण व नाशिक तसेच राज्यातील इतर विभागाचे अव्वल कारकून/मंडळ अधिकारी संवर्गातून पदोन्नतीचे प्रस्ताव मंत्रालयात दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्या प्रस्तावावर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा,अशी आमची मागणी आहे,असे सुचित करण्यात आले.

Exit mobile version