। चिरनेर । प्रतिनिधी ।
राज्य सरकारने येत्या पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा कायदा आणण्याचे जाहीर केले आहे. हा कायदा जनतेच्या मूलभूत लोकशाही हक्कावर प्रतिबंध करणारा तसेच सरकारला हुकूमशाहीकडे नेणारा आहे. त्यामुळे हा कायदा मागे घ्यावा, या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने मंगळवारी (दि.22) उरणमधील चार फाटा ते गांधी चौक असा मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. मोर्चात ‘सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विरोध करणारा हा कायदा मागे घ्या’, आशा घोषणा देत हा मोर्चा काढण्यात आला. त्यासाठी उरणमध्ये गावोगावी जनजागृती करण्यात आली. यावेळी जनसुरक्षा कायद्या विरोधात उरणमधून 10 हजार स्वाक्षर्या जमा करण्यात आल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रायगड जिल्हा सचिव कॉ. रामचंद्र म्हात्रे यांनी दिली आहे. तसचे, कामगार नेते भूषण पाटील, संजय ठाकूर, महिला नेत्या हेमलता पाटील यांनी या निदर्शनाचे नेतृत्व केले.