शिक्षकांशी एकनिष्ठ राहिलो याचाच अभिमान

जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोवर पेन्शन स्वीकारणार नाही
| नेरळ । वार्ताहर ।
कोकणातील सहा जिल्ह्यातील शिक्षकांनी आपल्याला निवडून दिले आहे आणि त्याची उतराई करण्याचा प्रयत्न आपल्या आमदारकीच्या काळात करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या आमदारकीच्या काळात माझ्या आचरणातून कोणत्याही शिक्षकाला,शिक्षण संस्थेला आणि कर्मचार्‍याला मान खाली घालावी लागली नाही याचा अभिमान असल्याचे शिक्षक आ. बाळाराम पाटील यांनी जाहीर केले. दरम्यान शिक्षकांची जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी होणार नाही तोवर आपण आपल्या आमदारकीची पेन्शन स्वीकारणार नाही अशी घोषणा पाटील यांनी यावेळी केली.

कोकण शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक लढविणार्‍या टीडीए पुरस्कृत पुरोगामी शिक्षक संघटना आणि महविकास आघाडीचे उमेदवार आ. पाटील यांच्या प्रचारासाठी शिक्षक संवाद सभेचे आयोजन केले. यावेळी राजिपचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, नितीन सावंत, शेकापचे ज्येष्ठ विलास थोरवे,भगवान चंचे, शेकाप तालुका चिटणीस श्रीराम राणे,उत्तम कोळंबे, शिवाजी खारीक, शरद लाड, शेकाप खालापूर तालुका माजी चिटणीस संतोष जंगम, पनवेल तालुका चिटणीस पाटील,नगरसेवक गणेश कडू, संपत हडप, महेश म्हसे, दत्तात्रय पिंपरकर, तानाजी मते आदी मान्यवर उपस्थित होते.

पुण्यातील भिडे वाडा येथील फुले दांपत्याने स्त्री शिक्षणाची सुरुवात केली आणि आम्ही त्याच ऐतिहासिक ठिकाणावरून पायी दिंडी काढली. पण काही झाले नाही आणि शेवटी आम्ही मंत्रालयातील छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आम्ही सात शिक्षक आमदार म्हणून आम्ही आंदोलन सुरू केले होते. अशा आंदोलनातून शिक्षकांच्या कामगारांचा अनुदानाचा विषय संपवून शिक्षकांना न्याय देण्याचा प्रश्‍न सोडविण्यात आम्हाला यश आले असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले.


शेकापचे नेते विलास थोरवे यांनी यावेळी शिक्षक वर्गाला मार्गदर्शन करताना 740 किलोमिटर 49 तालुके सर्व माध्यमिक शाळा 30 वर्षात प्रत्येक शाळेत जावून शिक्षक आमदार असतो हे बाळाराम पाटील यांनी दाखवून दिले आहे. हे असे आमदार आहेत की त्यांनी शिक्षक कर्मचारी यांच्या अंशदान पेन्शन योजना मंजूर करण्यासाठी पायी दिंडी काढली असे सांगितले. जुनी पेन्शन योजना साठी मुंबई येथे उपोषण आंदोलने केली. पाटील यांना भेटण्यासाठी कोणत्याही वाशिल्याची गरज नसते आणि ते स्वतः थेट फोन वरून उपलब्ध असतात.शिक्षक संस्था चालविणारे बाळाराम पाटील यांनी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी गेली आहे असे जाहीर केले आहे अशी माहिती दिली. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख उत्तम कोळंबे यांनी बोलताना मागील सहा वर्षापूर्वी निवडणूक झाली होती,त्यावेळी शिवसेना विरोधात होती,मात्र यावेळी महविकास आघाडी एकत्र असल्याने या निवडणुकीत बाळाराम पाटील यांचा विजय निश्‍चित आहे असे यावेळी जाहीर केले.

Exit mobile version