आरोग्य केंद्रात सोयीसुविधा पुरविणार; किशोर जैन यांची ग्वाही

| नागोठणे | वार्ताहर |
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सोयीसुविधांविषयीच्या बाबतीत मी समाधानी नाही. नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात येणार्‍या रुग्णास उपचारासाठी खासगी रुग्णालयात जावे लागणार नाही, अशा पद्धतीने नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र हे सर्व सोयीसुविधांयुक्त असेल, असा मानस शिवसेना नेते किशोर जैन यांनी व्यक्त केला.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अंतर्गत दुरुस्ती, गवळ आळी येथे नवीन अंगणवाडी आणि पेव्हर ब्लॉक रस्त्याचे उद्घाटन किशोर जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच रंजना राऊत, सदस्य मोहन नागोठणेकर, सुरेश जैन, ज्ञानेश्‍वर साळुंखे, रुपाली कांबळे, कल्पना टेमकर, प्रकाश कांबळे, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर, माजी उपसरपंच सुरेश कामथे, मंगेश कामथे, प्रकाश मेस्त्री, शाखाप्रमुख धनंजय जगताप, राजेंद्र पिताणी, राजेंद्र टेमकर, अशपाक पानसरे, सद्दाम दफेदार, अनिल महाडिक, पांडुरंग कामथे, प्रसाद जोगत, शेखर जोगत, संतोष नागोठणेकर, नामदेव चितळकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदकीय अधिकारी डॉ. आदित्य शिरसाठ, वंदन तांबोळी, भाऊ आमडोसकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version