। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगरपालिकेच्या कंत्राटी सफाई, घंटागाडी आणि धूर फवारणी कामगारांना सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 नुसार पावसाळ्याचे उत्तम गुणवत्तेचे रेनकोट व स्लीपर देणेबाबत तशा सूचना संबंधित ठेकेदाराला द्याव्यात, अशी मागणी आझाद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. पनवेल महानगर पालिका ठेकेदार यांच्या अंतर्गत काम करणार्या सफाई, घंटागाडी आणि धुर फवारणी कंत्राटी कामगारांना उत्तम गुणवत्तेचे रेनकोट व स्लीपर देण्याच्या सूचना कराव्यात, मागील वर्षी अनेक कामगारांना चांगल्या प्रतीच्या वस्तू मिळाल्या नव्हत्या, तशा तक्रारीदेखील आझाद कामगार संघटनेने केल्या होत्या. रेनकोट व चप्पल घेण्यासाठी काही कामगार व युनियन प्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन उत्तम गुणवत्तेचे रेनकोट व स्लीपर कामगारांना देण्यात याव्यात, तशा सूचना आपण ठेकेदारांना देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.