। पनवेल । वार्ताहर ।
भगवन गौतम बुद्ध यांच्या 2565 जयंती निमित्त बुद्ध पौर्णिमा खांदा वसाहतीच्या मूलगंध कुटी बुद्ध विहारात साजरा करण्यात आला. यावेळी मेणबत्ती प्रजलित करुन पंचांग प्रणाम करुन तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करण्यात आले.
बुद्ध विहारात आलेले धम्म बांधवांनी बुद्ध वंदना घेतली. सर्वाना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्या दिल्या. तसेच यावेळी धम्म प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सर्वांना खीर दान करण्यात आली. खांदा वसाहत सेक्टर 13 मूलगंध कुटी विहार ट्रस्टच्या वतीने बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ट्रस्ट सल्लागार चंद्रसेन कांबळे, अध्यक्ष दिनेश जाधव, कार्यकर्ते भालेराव जाधव, विनोद साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.