घाटरस्त्यासाठी नवीन मिनीबस द्या: थोरवे

| माथेरान | बातमीदार |

कर्जत-माथेरान मार्गावर धावणाऱ्या मिनीबस सातत्याने बंद पडत असून, या मिनीबस डबघाईला आलेल्या आहेत. यामुळे आ. महेंद्र थोरवे यांनी माथेरान घाट रस्त्यासाठी दोन नवीन मिनीबसची मागणी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

कर्जत आगारातून माथेरानसाठी सुटणाऱ्या मिनीबस या सद्यःस्थितीत डबघाईला आल्या आहेत. वारंवार या मिनीबस घाट रस्त्यात बंद पडत आहेत. तर, अनेकदा या गाड्यांमधून घाट रस्त्यात धूर निघताना दिसतो, त्यामुळे प्रवासी भयभीत होतात. घाटात गाडी अनेकदा बंद पडते. त्यामुळे येथील नागरिक, शालेय विद्यार्थी तसेच प्रवास करणारे पर्यटक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या घाट रस्त्यात जुन्या झालेल्या मिनीबस चालविणे खूप धोकादायक आहे. अतिशय चढ-उतार असलेल्या घाट रस्त्यावर जुन्या झालेल्या मिनीबस गाड्यांमुळे केव्हाही अपघात होऊ शकतो. याकरिता नवीन मिनीबसची मागणी येथे जोर धरू लागली आहे. अनेक नागरिकांनी याबाबत तक्रार केली आहे.

Exit mobile version