पाणीटंचाईवर मात करण्यासाठी २५ लाखांची तरतूद

दहा ठिकाणच्या विहिरींची दुरुस्ती आणि गाळ काढणार
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात ट्रँकरने पाणी देण्याची योजना तसेच विंधन विहिरी खोदण्याची तसेच जुन्या विहिरीमधील गाळ काढण्याची तसेच करण्याची कामे केली जाणार आहेत. या योजनेमध्ये कर्जत तालुक्यात तीन गावांमध्ये आणि सात वाड्यांमध्ये असलेल्या विहिरींमधील गाळ काढण्याचे आणि त्या दुरुस्त करण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहेख् अशी माहिती कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांनी दिली.

कर्जत तालुक्यात यावर्षी गतवर्षीच्या यावर्षी अधिक प्रमाणात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्यानुसार संभाव्य पाणीटंचाई आरखडा तयार करण्यात आला आहे. त्यात पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये असलेल्या जुन्या विहिरींमधील गाळ काढून त्यात अधिक पाणीसाठा व्हावा असा प्रयत्न आहे. पाणीटंचाई कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी तीन गावामध्ये आणि सात आदिवासीवाड्यांमध्ये या विहिरींमधील गाळ काढला आहे. त्या दहा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या यावर्षीपासून दूर होण्याचा विश्‍वास जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाला आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने 25 लाखांची तरतूद केली असून, मे 2023 पूर्वी विहिरी खोदण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

यावर्षी पाणीटंचाई कृती आराखड्यात तालुक्यातील पेठ-वदप, किकवी-पाथराज, लाडीवाली -तिवरे ग्रामपंचायत अशा तीन गावात तर तुंगी-अंभेरपाडा, सागाची वाडी-दोन्ही आसल ग्रामपंचायत, खरवंडी कातकरी वाडी-बीड, कोतवालवाडी-नांदगाव, जांभूळवाडी-वारे आणि भडवळ ताकाची वाडी-दामत ग्रामपंचायत या ठिकाणी असलेल्या विहिरींमधील गाळ काढण्याचे आणि विहिरी दुरुस्त करण्याचे काम केले जाणार आहे. त्या प्रत्येक विहिरीसाठी अडीच लाखांचे अनुदान मंजूर असून, एकूण 25 लाखांची तरतूद पाणीटंचाई कृती आराखड्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version