दिव्यांगांना 5 टक्के निधीची तरतूद

माथेरान नगरपरिषदेचा स्तुत्य उपक्रम
। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या उत्पन्नातून 5 टक्के राखीव निधी 28 दिव्यांग बांधवांना थेट त्यांच्या खात्यात 8 रुपये माथेरान नगर परिषदेतर्फे वितरीत करण्यात आले.
याकरिता नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, गटनेते प्रसाद सावंत, विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे मुख्याधिकारी सुरेखा भणगे सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच कर्मचारी वृंद यांचे माथेरान दिव्यांग सेवा संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी धन्यवाद व्यक्त केले. या रकमेतून प्रत्येक दिव्यांग बांधव सक्षम होण्यासाठी मदत मिळणार आहे. तसेच अजूनही भरपूर दिव्यांग बांधवांकडे त्यांच्या अपंगत्वाचे प्रमाणपत्र नसल्याने त्यांनाही प्रमाणपत्र मिळविण्याचे प्रयत्न चालू आहेत. लवकरच त्यांनाही यामध्ये सामावून घेतले जाईल असे चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.

Exit mobile version