स्वखर्चाने केली झुडपांची छाटणी

चंद्रकांत घरत यांचा सामाजिक उपक्रम
। जेएनपीटी । वार्ताहर ।
आगरी, कोळी व कराडी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत यांनी गणेशोत्सवाचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे याही वर्षी उरण-पनवेल आणि नवघर रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पूल या ठिकाणी वाढलेली झाडे झुडपे छाटण्याचे काम हाती घेतले आहे. एकंदरी प्रवाशी वाहनांच्या अपघाताला कारणीभूत ठरत असलेल्या साईटपट्टीवरील झाडाझुडपांची छाटणीचे काम चंद्रकांत घरत यांनी स्वखर्चाने हाती घेतल्याने प्रवाशी नागरीकांनी घरत यांचे आभार व्यक्त केले आहेत.
उरण तालुक्यातील रहिवाशी गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्यामुळे गणेश उत्सवासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी उरण, पनवेल, नवीमुंबई शहरातील बाजारपेठत आपल्या मोटारसायकल किंवा इतर वाहनातून आपल्या कुटुंबासह प्रवास करत असतात. परंतु रस्त्याच्या साईटपट्टी वरील वाढणारी झाडेझुडपे सदर प्रवाशी नागरीकांच्या अपघातास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे चंद्रकांत घरत यांनी सामाजिक जीवनाशी बांधिलकी म्हणून गणेशोत्सवापूर्वी उरण-पनवेल रस्त्यावरील खड्डे भरण्याचे व साईटपट्टीवरील झाडा झुडपांची छाटणीचे काम हाती घेतले. त्यांच्या या समाजाभिमुख कार्याबद्दल सर्वस्तरातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Exit mobile version