एड्सबाबत पथनाट्यातून जनजागृती

| अलिबाग | वार्ताहर |

जिल्हा आरोग्य विभाग रायगड अलिबाग जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय रायगड अलिबाग यांच्या अंतर्गत जिल्हा शल्सचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली बंधने पाळा, एड्स टाळा या पथनाट्यातून महाड बस स्थानक येथे जनजागृती करण्यात आली.

यावेळी या कार्यक्रमास महाड आयसीटीसी धनश्री महाबळेश्वरकर समुपदेशक ग्रामीण रुग्णालय महाड, वासंती पाटील प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समीर सुतार सुपरवायझर, अश्विनी बाळगुडे लिंक वर्कर, स्वयंसिद्धा संस्थेचे किरण साळवी तसेच पथनाट्य कलाकार श्रुती नाईक, पार्थ म्हात्रे, यश म्हात्रे, निशांत नवखारकर, राज पाटील, ईशा ठाकूर, मेहविश कासुकर आदी उपस्थित होते. या पथनाट्यातून एचआयव्हीची तपासणी सरकारी रुग्णालयातील आयसीटीसी एकात्मिक समुपदेशन व सरकारी तपासणी केंद्र येथे करण्यात येते, ही तपासणी मोफत आणि गोपनीय आहे. तसेच एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्यास तो त्या व्यक्तीच्या शरीरात कायम राहतो, पण वेळेवर औषध घेऊन या उपचार केल्यास तो बरा होऊ शकतो असे मार्गदर्शन केले. अधिक माहितीसाठी जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधावा तसेच न्याकोचे ॲप डाऊनलोड करून माहिती घेऊ शकता, असे सांगितले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या होण्याकरिता ग्रामीण रुग्णालय महाड येथील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version